Headlines

कणकवली महाविद्यालयात करिअर कट्टा कार्यशाळा…

⚡कणकवली ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्हा करिअर कट्टा विभागाची कार्यशाळा कणकवली महाविद्यालयात नुकतीच पार पडली. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयीन समन्वयक उपस्थित होते. या कार्यशाळेला महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी मार्गदर्शन केले.


शितोळे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ऑन जॉब टे्रनिंग व इंटरशिपसाठी करिअर कट्टा विभागाची भूमिका विषद केली. तसेच सर्व महाविद्यालयांनी सी. एस. आर. प्रोजेक्ट सादर करावेत व महाविद्यालयांना निधी मिळवून देण्यास व विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट प्रशिक्षण करून देण्याचे आवाहन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नवीन सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणीसाठी काही महाविद्यालयांची निवड करण्यात आली. कोकणकन्या योजनेंतर्गत आणखी दोन महाविद्यालयांची लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली. सर्व महाविद्यालयांमध्ये खादी ग्रामोद्योगमार्फत मधुमक्षिका पालन प्रशिक्षण केंद्र उभा करण्यासाठी आवाहन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युवा कल्याण केंद्र उभा करण्यासाठी नियोजन करण्यात आले व त्याविषयी माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन कणकवली महाविद्यालय कणकवली करिअर कट्टा समन्वयक डॉ. बी.एल. राठोड व महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे यांनी केले. जिल्हा समन्वयक डॉ. अजित दिघे यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या करिअर कट्टा योजनांचा आढावा कार्यशाळेत घेतला. सिंधुदुर्ग जिल्हा प्राचार्य प्रवर्तक डॉ. सी. एस. काकडे यांनी सर्व महाविद्यालयांमध्ये करिअर कट्टा प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. तसेच करिअर कट्टा विभागाच्या विविध योजनांचे महत्व मांडले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये करिअर कट्टा विभागाची भूमिका त्यांनी स्पष्ट केले. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी कार्यशाळेला अध्यक्षीय संबोधन केले. सूत्रसंचालन प्रा. सचिन दर्पे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. प्रवीण कडुकर यांनी केले.

You cannot copy content of this page