⚡दोडामार्ग ता.२९-: खासदार विनायक राऊत यांच्या प्रचाराने वेग घेतला असून महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत.त्यांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे.त्यांनी तालुक्यातील तीनही जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय प्रचार सुरू ठेवला आहे.
महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पदाधिकारी एकत्रितपणे खासदार विनायक राऊत यांचा घरोघरी प्रचार करीत आहेत.
…….
चौकट
‘मशाल ‘ घरोघरी पोचवण्याचा प्रयत्न
तालुक्यातील जिल्हा परिषद मतदार संघनिहाय प्रचार करताना त्यांनी प्रत्येक घराघरांत जात शिवसेनेच्या बदललेल्या मशाल चिन्हांची माहिती मतदारांना करून दिली जात आहे. यापूर्वी खासदारांनी आपल्या
कार्यकाळात केलेली विकासकामे या जोरावर पुन्हा एकदा विनायक राऊत खासदार होतील, असा विश्वास पदाधिकारी, कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. तिसऱ्यांदा विनायक राऊत खासदार होण्यासाठी महाविकास आघाडीचे घटक पक्ष प्रयत्न करत आहेत.
……..
