गवंडीवाडा सार्वजनिक शौचालयाची सौरभ ताम्हणकर यांच्या माध्यमातून दुरुस्ती…

बूथ क्र ९५ मधील भाजपच्या आढावा बैठकीत नागरिकांनी व्यक्त केली होती समस्या:समस्या दूर केल्याने नागरिकांनी मानले आभार..

मालवण (प्रतिनिधी)

मालवण शहरातील गवंडीवाडा भागातील नगरपरिषदेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या दुरावास्थेबाबत तेथील नागरिकांनी भाजपच्या बूथ क्र. ९५ मधील आढावा बैठकीत भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांचे लक्ष वेधले असता ताम्हणकर यांनी याबाबत तातडीने शौचालय दुरुस्तीसाठी साहित्य उपलब्ध करून दुरुस्तीचे काम सुरु केले आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी सौरभ ताम्हणकर यांचे आभार मानले.

मालवण शहरातील गवंडीवाडा परिसरातील विविध कामांची मागणी तेथील स्थानिक नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या बूथ क्र. ९५ मधील आढावा बैठकीत मांडली होती. गवंडीवाडा भागातील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था झाली असून त्याकडे मालवण नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत होते. या शौचालयाचा वापर त्या परिसरातील १५ ते २० कुटुंब करत आहेत. याबाबत नागरिकांनी ताम्हणकर यांचे लक्ष वेधल्यावर सौरभ ताम्हणकर यांनी त्या ठिकाणाची पाहाणी करत त्या शौचालयाचा तुटलेला लाईट स्विच, तुटलेले दरवाजे, तुटलेली कडी आदी बदलण्यासाठी तात्काळ साहित्य उपलब्ध करून देत काम सुरु केले. तसेच शौचालयातील विद्युत पुरवठा गेले दोन वर्ष खंडीत झाला असल्याने त्याबाबत तसौरभ ताम्हणकर यांनी मालवण वीज वितरण विभागाशी संपर्क साधून लाईन बदलण्यास सांगितले. त्याचप्रमाणे मालवण गवंडीवडा ते मालवण बाजारपेठ परिसरातील स्ट्रीट लाईट गेले अनेक महिने बंद होते. याची माहिती मिळताच सौरभ ताम्हणकर यांनी मालवण नगरपरिषदेशी संपर्क साधतं लाईट उपलब्ध करून घेत तात्काळ ठेकेदाराच्या सहकार्याने बदलून घेतले.
त्याचप्रमाणे गवंडीवाडा प्रभागातील उर्वरित कामेही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील, असे सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page