नारायण राणे : मी साहेब नाही तर तुमचा सेवक त्यामुळे मला भरघोस मतदान करा..
सावंतवाडी
मी देशात,राज्यात काम करत असलो तरी सिंधुदुर्ग माझा हक्काचा आहे. मी राजकारणात कधीच जातपात पाहीले नाही. महीला, युवा ,शेतकरी, गरीब या देशातील जाती आहे त्यामुळे येणार्या काळात मोदीसोबत या जातीच्या बाबतीत काम करणार आहोत. विरोधक राजकारण करतांना जातीचा आधार घेत आहेत. मी फक्त माणुसकी जपतो त्यामुळेच इथल्या लोकांची आर्थिक सुबत्ता यावी म्हणून माझे काम सुरू आहे. मात्र इथल्या खासदारांनी दहा वर्षात साधी बालवाडी तरी आणली का? त्यामुळे येणाऱ्या सात तारखेला मला भरघोस मतदान करा मी साहेब नाही तर तुमचा सेवक आहे असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सावंतवाडी बाहेरचावाडा येथे मुस्लिम बांधवाना केले.
