नारायण राणेंच्या विजयासाठी कार्यकर्ता पेटून उठला…

विशाल परब : कार्यकर्त्यांमधील मतभेद दूर..

⚡सावंतवाडी ता.२७-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 400 पारच्या नाऱ्याला कोकणातून सुरूवात होणार असून सर्व कार्यकर्ते राणेंच्या विजयासाठी पेटून उठले आहेत. त्यामुळे राणे 85 ते 90 टक्के मतदान घेऊन मोठ्या मताधिक्याने विजय होतील असा विश्वास भाजप युवा नेते विशाल परब यांनी आज येथे व्यक्त केला.

दरम्यान महायुतीतील कोणत्याही कार्यकर्त्यामध्ये आता मतभेद नसून सर्वांची मने जुळलेली आहेत. त्यामुळे सर्वजण एक दिलाने काम करून राणेसाहेबांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणतील, असे श्री परब यावेळी बोलताना म्हणाले. ते जुना बाजार येथे प्रचार शुभारंभ कार्यक्रमानिमित्त बोलत होते.

You cannot copy content of this page