दीपक पाटकर:नागरिकांच्या मागणीनुसार यापुढेही अधिकाधिक विकासकामे मंजूर होतील..
⚡मालवण ता.२६-:
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आमचे दैवत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचे श्रेय त्यांचेच आहे. येथील अधिकाधिक विकासासाठी हक्काचे नेतृत्व म्हणून राणे साहेब यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करूया. असा निर्धार मालवणचे कार्यसम्राट नेतृत्व दीपक पाटकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या मालवण शहर बुथ क्र. 93 च्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते निलेश राणें यांनी दीपक पाटकर या विभागात उपलब्ध करून दिला. नागरिकांच्या मागणीनुसार यापुढेही अधिकाधिक विकासकामे मंजूर होतील. असा विश्वास दीपक पाटकर यांनी या निमित्ताने व्यक्त केला.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष दीपक पाटकर, माजी आरोग्य सभापती आप्पा लुडबे, भाजप महिला तालुकाध्यक्ष तथा बुथ अध्यक्ष पुजा करलकर, शक्तीकेंद्र प्रमुख प्रमोद करलकर, माजी नगरसेवक जगदीश गांवकर, शिवसेना शहरप्रमुख बाळू नाटेकर यांसह भाजप पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
