⚡कणकवली ता.२६-:
मुंबईहून मालवणच्या दिशेने जाणाऱ्या कारचा टायर फुटल्याने कार पलटी झाली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र, कारचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात बेळणे येथे दुपारी ३.३० वा. च्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर झाला.
मुंबई येथील कुटुंबीय आपल्या ताब्यातील कार घेऊन मालवणच्या दिशेने जात होती. त्यादरम्यान कार बेळणे येथे आली असता अचानक कारचा टायर फुटला. परिणामी चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार महामार्गालगत पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी कारमधील व्यक्तींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात कारमधील व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली असून कारच्या समोरील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे.
