शेठ. न. म. विद्यालयाच्या प्राथमिकविभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा..

कणकवली ः खारेपाटण येथील शेठ न. म. विद्यालयाच्या प्राथमिक विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ कै. चंद्रकांत परिसा रायबागकर सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. यावेळी सदाभाऊ खोत यांचे स्वीय सहाय्यक अआदिनाथ कपाळे, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, शेठ न.म. विद्यालय व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य संजय सानप, सीनियर कॉलेजचे प्राचार्य ए.डी.कांबळे, विद्यालयाचे पर्यवेक्षक संतोष राऊत, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वृषाली दर्पे आदी मान्यवर उपस्थित होते.


मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. महिला पालकांसाठी आयोजित केलेल्या पाककला स्पर्धेचे बक्षीस वितरणही करण्यात आले. आदिनाथ कपाळे, प्रवीण लोकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शर्मिन काझी यांनी केले. आभार अंकिता सावंत यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page