ओसरगाव येथील ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश…

⚡कणकवली ता.२६-: ओसरगाव-गवळवाडी येथील शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्त्यांनी ओम गणेश निवासस्थानी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचे नीतेश राणेंनी स्वागत केले. सदानंद मोरे,शिवराम मोरे,गणेश मोरे,प्रमोद मोरे,प्रभाकर देसाई,विनोद देसाई,प्रथमेश देसाई,अतुल मोरे,रवी बंटीवरडार,रदीर बेनेटी,परशुराम मोरे,विलास राणे,स्वप्निल राणे,उषा देसाई,प्रतीक्षा देसाई,प्रमिला देसाई,जानवी मोरे,दिशा मोरे,सुहासिनी मोरे ,महेश वारंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेशाच्यावेळी माजी जि. प. अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,राहुल आंगणे, सुदर्शन नाईक आदी उपस्थित होते. नीतेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन हा प्रवेश केल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page