कार्यकर्त्यांशी साधणार संवाद ; माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांची माहिती..
दोडामार्ग ता.१९-:
रत्नागिरी – सिंधुदूर्ग लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते ना.नारायण राणे उद्या शनिवारी दोडामार्ग दौऱ्यावर येत असून संध्याकाळी ४ वा.परमेकर हॉल येथे प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करणार आहेत .तरी तालुक्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कसई- दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी केले आहे.
येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी ही बैठक होणार असल्याचे समजते . शुक्रवारी शक्तिप्रदर्शन करत राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी उद्या ते दोडामार्गात येत असल्याने या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे
