देवबाग येथे २५ रोजी जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा…

⚡मालवण ता.१८-: देवबाग येथील चेतन हनुमान मंदिराच्या श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व हनुमान जन्मोत्सवा निमित्त गुरुवार दि. २५ एप्रिल रोजी रात्री १०वा. राज्यस्तरीय एकेरी रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे रू. ७०२४ व चषक, रू. ५०२४ व चषक, रू. ३०२४ व चषक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. तरी इच्छुक स्पर्धकांनी सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी ८०८०९३८८१० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page