भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई
*💫वेंगुर्ला दि.२४-:* जिल्हा परिषद अध्यक्षपदी आज झालेल्या निवड प्रक्रियेत संजना सावंत यांची निवड झाली.याबाबत भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की,महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य निश्चितच प्रेरकच आहे.कोकणचे भाग्यविधाते म्हणून आजही गणना होत असलेल्या खासदार नारायण राणे यांच्यावर जिल्हा परिषद सदस्य यांनी शिवसेनेच्या भूलथापाना बळी न पडता त्यांच्यावर विश्वास ठेवला.त्यामुळेच सर्व ३० ही मते भाजपच्या संजना सावंत यांना मिळाली व त्या मोठ्या फरकाने विजयी झाल्या. फोडाफोडीचे राजकारण करुन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचे शिवसेना व महाविकास आघाडीचा डाव धुळीस मिळाला.गेली २५ ते ३० वर्षे नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास झाल्यामुळे त्यांच्यावर विश्वास टाकून पुन्हा जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात दिली आहे.त्यामुळे भविष्यातही नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व निवडणुका या भाजपच्या अधिपत्याखाली आल्याशिवाय राहणार नाही आणि शिवसेनेने असे फोडाफोडीचे राजकारण करुन सत्तेची स्वप्ने बघू नयेत,असे म्हटले आहे.तसेच जोपर्यंत नारायण राणे या कोकणचे नेतृत्व करतील, तोपर्यंत सर्व सत्तास्थाने ही नारायण राणे यांच्याच ताब्यात राहतील,असा विश्वास यावेळी प्रसन्ना उर्फ बाळू देसाई बोलताना यांनी व्यक्त केला.
