⚡मालवण ता.१०-: मालवण रेवतळे येथील सुनिल महादेव खरात (वय ३२) या तरुणाचा मृतदेह नायलॉनच्या दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत आज बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आला. याप्रकरणी त्याचा भाऊ विनय खरात याने मालवण पोलीस स्थानकात खबर दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनिल खरात हा रेवतळे येथे भाड्याच्या खोलीत रहात होता. बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास विनय खरात याला सुनिल हा गळफास लावलेल्या स्थितीत दिसला. त्यानंतर रेवतळे येथील नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालय प्रशासनाने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.
याबाबत त्याचा भाऊ विनय याने मालवण पोलीस स्थानखात खबर दिल्यावर पोलीसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विलास टेंबुलकर हे अधिक तपास करीत आहेत.
