आर्मी व नौदलातील विद्यार्थ्यांचा सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.१०-: बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या एनसीसी युनिटचे कॅडेट्स श्रीराम संतोष गावडे आणि निकिता गावडे यांचे भारतीय सैन्याच्या अनुक्रमे आर्मी आणि नौदलात निवड झाल्यामुळे प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

  यावेळी नॅक सल्लागार समितीचे चेअरमन प्रा.डी.आर.राणे, इंग्रजी विभागप्रमुख डॉ.एम.एम.मुजुमदार, हिदी विभागप्रमुख प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर, तत्वज्ञान विभागाचे प्रमुख डॉ.सुनिल भिसे, समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.एल.बी.नैताम व मराठी विभागप्रमुख प्रा.एस.जी.चुकेवाड, एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट डॉ.बी.जी.गायकवाड, कॅडेट रूपाली दाभोलकर आदी उपस्थित होते. यशस्वी कॅडेट्स श्रीराम गावडे आणि निकिता गावडे यांनी महाविद्यालयाने वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. तर सर्व एनसीसी कॅडेटसना एनसीसीचे महत्व व यातून भारतीय सैन्यात नोकरीची व देशसेवेची उपलब्ध असणारी प्रचंड संधीचे महत्व विषद केले.
You cannot copy content of this page