पराभव भीतीतूनच विनायक राऊत यांची बालिश बडबड…

भाजपच्या प्रदेश महिला सदस्या मोहिनी मडगांवकर यांची टिका:जीभ घसरून स्वतःचा पराभव केला मान्य..

⚡सावंतवाडी ता.०७-: मोदी लाटेत दोन वेळा भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने निवडून आलेले विनायक राऊत आता महायुतीच्या उमेदवारासमोर आपला निभाव लागणार नाही हे समजून चुकल्याने व पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने सैरभर झाले आहेत. त्यातूनच त्यांच्याच तोंडातून स्वतःच्या पराभवाची भाषा बोलली जात आहे, अशी टीका भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश महिला सदस्य व शहर मंडळ सावंतवाडी महिला अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी केली आहे.
नारायण राणे यांना आपण आव्हान समजत नाही हे बोलताना विनायक राऊत यांच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट स्पष्टपणे दिसत आहे. ते पूर्णपणे आतून घाबरून गेले आहेत. नारायण राणे यांच्यासमोर आपला काही निभाव लागणार नाही हे समजल्यामुळे ते काहीही बरळत आहेत. त्यातूनच त्यांच्या बोलण्यातून अनवधनाने खरं बाहेरही पडलेला आहे की तिसऱ्या वेळी नारायण राणेच निवडून येतील, असा टोलाही सौ.मडगावकर यांनी लगावला आहे.
मुळात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर बोलायची राऊत यांची पत नाहीय. माजी खासदार निलेश राणेंवर बोलतानाही यांनी विचार करायला हवा की त्यांनी अपक्ष राहून पावणेतीन लाख मत मिळवली होती. मात्र, तुम्ही स्वतःची कोणतीही कुवत नसताना केवळ भाजपच्या पाठिंब्यावर दोन वेळा निवडून गेलात. या निवडणुकीत तुम्हाला तुमची जागा नक्कीच दिसेल, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.

You cannot copy content of this page