कुडाळमध्ये अनोळखी ईसमाचा आढळला मृतदेह…

कुडाळ :कुडाळ तालुक्यातील कुडाळ पानबाजार येथील शमशुद्दीन लतीब शेख यांच्या कुडाळ पंचायत समिती मागे असलेल्या नारळ काजू बागेत एका अज्ञात ईसमाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत मिळाला आहे. ही घटना शनिवारी दि. ६ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वा.निदर्शनास आली.
शमशुद्दीन लतीब शेख यांची कुडाळ पंचायत समितीच्या मागे नारळ काजूची बाग आहे. नेहमी प्रमाणे ते शनिवारी सकाळी ७.३० वा. आपल्या बागेत गेले होते. यावेळी बागेत घाणेरडा वास येऊ लागला. यावेळी त्यांनी पाहिल्यावर बागेच्या कुपणाच्या बाहेर एक ईसम उताण्या स्थितीत आढळला. जवळ जाऊन पाहिल्यावर तो मयत व कुजलेल्या स्थितीत होता. या ईसमाला त्यांनी यापूर्वी कधीही पाहिले नसल्याने कुडाळ पोलिस स्थानकात दिलेल्या फिर्यादीत नमुद केले आहे. हा ईसम अंदाजे ६० वर्षीय आहे. हा मृत्यू सुमारे सहा दिवसांपुर्वी झाला असावा. त्यामुळे मृतदेह बर्याच प्रमाणात कुजलेला असल्याने ओळख पटवणे कठीण झाले आहे.या घटनेची नोंद कुडाळ पोलीसात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे . घटनास्थळी पोलीस दयानंद चव्हाण व श्री मळगांवकर यांनी भेट देऊन पंचनामा केला अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.

You cannot copy content of this page