रामेश्वर मांड मित्रमंडळातर्फे आयोजित विविध शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.०६-: मालवण सोमवार पेठ येथील श्री देव रामेश्वर मांड मित्रमंडळाच्या वतीने आयोजित आधार कार्ड अपडेट, आभा व आयुषमान कार्ड नोंदणी, मतदार कार्ड नोंदणी, विश्वकर्मा योजना नोंदणी व नेत्र तपासणी शिबीराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये आधारकार्ड साठी ७१ जणांनी, आभा, आयुषमान कार्ड व विश्वकर्मा योजनेसाठी ६३ जणांनी व नेत्र तपासणी शिबिराचा ६६ जणांनी लाभ घेतला.

या शिबिरात आधारकार्ड, आभा व आयुषमान कार्ड नोंदणीसाठी भूषण धुरी यांचे तर नेत्र तपासणी शिबिरासाठी विवेकानंद नेत्रालय कणकवलीच्या डॉक्टरांचे सहकार्य लाभले. या शिबिरास मिळालेला प्रतिसाद पाहून शनिवारी देखील ही शिबीरे घेण्यात आली, त्यासंही उत्तम प्रतिसाद लाभला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी रामेश्वर मांड मित्र मंडळाचे कार्यकर्ते सदा चुरी, छोटू तारी, संतोष खराडे, योगेश कांबळे, दिलीप वायंगणकर, सुरेश पेडणेकर, प्रसाद आरोंदेकर, शिवाजी म्हापणकर, वसंत धुरी यांचे सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page