वैभववाडीत रविवारी आरोग्य व महारक्तदान शिबीर

⚡वैभववाडी ता.०५-: वैभववाडी पोलीस ठाणे, सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी, एस एस पी एम लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे तसेच राजेश मोतीराम पडवळ जनसेवा चाॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त वैभववाडीत आरोग्य शिबीर व महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

रविवार दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 वाजता वैभववाडी पोलीस ठाणे येथे आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिराची सुरुवात होणार आहे या शिबिरामध्ये हृदयरोग तपासणी, नेत्र तपासणी,युरोलाॅजी तपासणी ,अस्थिरोग तपासणी, जनरल सर्जरी, नेफ्रोप्लॉजि तपासणी, कर्करोग तपासणी दंतरोग, प्रसूद्दीशास्त्र आणि स्त्रीरोग तपासणी करण्यात येणार आहे तरी वैभववाडी तालुका पंचक्रोशीतील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा व रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे असे आव्हान वैभववाडी पोलीस ठाणे व सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी याच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page