⚡कणकवली ता.०५-: कणकवली येथे कामानिमित्त राहत असलेले प्रवीण गणेश घाडीगावकर (४०, मूळ रा.हरकुळ बुद्रुक बोडकवाडी) हे ३ एप्रिल पासून बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध घेऊ नये ते न सापडल्याने ते बेपत्ता असल्याची खबर त्यांची पत्नी पूर्वी प्रवीण घाडीगावकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे.
प्रवीण घाडीगावकर हे कणकवली येथील हॉटेल मध्ये कामाला आहेत. त्यामुळे ते त्या हॉटेलचे मॅनेजर तोरस्कर यांच्या कडे राहत होते. ३ एप्रिल रोजी तोरस्कर यांनी प्रवीण घाडीगावकर यांच्या पत्नीला फोन लावून सांगितले की तुमच्या पती सकाळी ६ वाजता रूमवरून निघून गेला आहे तो अजूनही परत आला नाही आहे. त्यामुळे ४ एप्रिल रोजी प्रवीण घाडीगावकर यांच्या पत्नी साई पॅलेस हॉटेल येथे जाऊन पाहिले असता तिथे ही ते दिसून आले नाहीत. प्रवीण घाडीगावकर यांनी अंगावर सफेद रंगाचा फुल शर्ट, काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, उंची ५ फूट, रंग गोरा, पायात लाल रंगाची चप्पल अशा वर्णनाची व्यक्ती दिसल्यास कणकवली पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
