कुडाळ – पाट मार्गावर माड्याचीवाडी – फणसवाडी स्टॉप येथे वाहनाची सांबराला धडक…

काल रात्रीची घटना:सांबर जखमी…

⚡कुडाळ ता.०६-: कुडाळ – पाट मार्गावर काल रात्री माड्याचीवाडी – फणसवाडी स्टॉप येथे अज्ञात वाहनाची धडक बसून सांबर जातीचा मोठा हरीण जखमी झाला. कार किंवा रिक्षाची मागून धडक बसल्याने ते सांबर जखमी झाले. सांबराच्या मागील बाजूने त्याला उभे राहता येत नव्हते. याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी वन विभागाला दिली.

वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी ताबडतोब पोहोचून सांबराला पुढील उपचारासाठी ताब्यात घेतले. या घटनेची नोंद कुडाळ वन विभागाकडे करण्यात आली आहे. सदर सांबर जातीचा हरीण ८ ते १० फूट लांब जातीचा असून माड्याची वाडी – फणसवाडी हा जंगलमय भाग असल्याने अनेकदा वन्यप्राणी रस्त्यावर येतात. प्रामुख्याने हे वन्यप्राणी प्रामुख्याने रात्री वाहनांना त्यांचा अंदाज येत नाही आणि अपघात घडत त्यामुळे सुरक्षितपणे तसेच वेगवान पद्धतीने चालवू नये आणि अपघात टाळावा असे आवाहन वनविभागाने सुद्धा केले आहे.

You cannot copy content of this page