⚡कणकवली ता.०४-: केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या इन्स्पायर योजनेंतर्गत कोल्हापूर येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे याठिकाणी
विज्ञानप्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 शाळांची निवड करण्यात आली होती. यात माध्यमिक विद्यालय
बीडवाडीचा विद्यार्थी याने सार्थक संजय कुयेस्कर याने स्मार्ट ब्लाइंड स्टिक ही विज्ञान प्रतिकृती तयार केली होती. ही प्रतिकृती लक्षवेधी ठरली.
स्मार्ट ब्लाइंड स्टिक ही प्रतिकृती अंध व्यक्तींसाठी अतिशय उपयुक्त आहे. स्टिकच्या सहाय्याने अर्धा किंवा एक किलो मीटर अंतरावरील भिंत किं
वा कोणताही अडथळा समजतो. अडथळा असेल तर व्हायब्रीड होऊन गजर वाचतो. अंध व्यक्तीला चालण्याकरिता या स्टिकचा उपयोग होतो. हे
उपकरण तयार करण्यासाठी सार्थक याला मुख्याध्यापक सुमुख जोशी व शिक्षक आनंद कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे सहावीपासून पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणार्या इनोव्हेशन इन सायन्स पस्युट फॉर
इन्स्पायर रिसर्च (इन्स्पायर) या योजनेंतर्गत विज्ञान प्रदर्शन भरविण्यात येते. या प्रदर्शनासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्याला 10,000 रुपये
शासनातर्फे देण्यात येतात. विद्यार्थ्यांनी आपल्या स्वयंम कल्पनेने तयार केलेली विज्ञान प्रतिकृतीची प्रदर्शनात मांडणी केली जाते.
सार्थकची विज्ञान प्रतिकृती ठरली लक्षवेधी…
