⚡मालवण ता.०२-: जानेवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप (बीडीएस) परीक्षेत मालवण येथील जय गणेश इंग्लिश स्कूल इयत्ता सातवी मध्ये शिकणार्या जुई संजय चोपडे हिने गोल्ड मेडल पटकाविले.
जुई हिला जय गणेश इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. जुई चोपडे ही शासकीय तंत्रनिकेतन मालवणचे अणूविद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. संजय चोपडे व अभ्यागत अधिव्याख्याता (गणित) सौ. पल्लवी संजय चोपडे यांची कन्या होय.