राष्ट्रवादीचे दोडामार्ग सामाजिक न्याय अध्यक्ष गोविंद कदम यांची मागणी
*💫दोडामार्ग दि.२३-:* दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात काही वाड्यावर गेल्या अनेक वर्षांपासून जातीयवाचक अशी नावे आजही तशीच आहेत. त्यामुळे समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा होत चालला आहे. तेव्हा अशी नावे तातडीने बदलावी, अशी मागणी दोडामार्ग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष गोविंद केशव कदम, यांनी दोडामार्ग तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. दोडामार्ग नायब तहसीलदार एन, एन. देसाई यांची सोमवारी गोविंद केशव कंदम, नवराज कांबळे, विजय कांबळे, यांनी भेट घेऊन निवेदन दिले. दोडामार्ग तालुक्यात आजही काही वाड्यावर हरीजनवाडी, सुतारवाडी, धनगरवाडी, गवळीटेंब, अशी नावे आहेत, त्यामुळे या नावामुळे जातीयवाद याला खतपाणी घालणे असा प्रकार आहे. महाराष्ट्र सरकारने ही नावे बदलून तेथे महापुरुष, यांची नावे द्यावीत शासनाने तसा जीआर काढला आहे.याची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली.
