शासनाने त्यावर कारवाई करावी; सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांची मागणी
*💫मालवण दि.२२-:* गाड्यांवर भारत सरकार, राज्य सरकार, पोलीस, आर्मी व अन्य लोकप्रतिनिधी यांच्या नावाच्या पाट्या लावून काही हौशी पर्यटक मंडळी आणि कुटुंबातील सदस्य आपली मौजमजा करण्याकरिता अख्खा महाराष्ट्र फिरत असतात. यांवर सरकारी यंत्रणेने त्वरीत लक्ष देऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी तारकर्लीचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे. सिंधुदुर्गसह रत्नागिरी व गोवा राज्यात फिरायला येणारे पर्यटक हे शासकीय विभागाच्या नावाचे फलक गाड्यांवर लावून फिरत असून आपला प्रवास टोल मुक्त व्हावा व आपल्याला कमी पैशात चांगल्या सुविधा मिळाव्यात हा बहुधा विचार करून हे प्रकार केले जात असल्याचा संशय श्री बापर्डेकर यांनी व्यक्त करून या गाड्यांची गणना शासकीय यंत्रणा करते की नाही हा एक प्रश्न आहे वास्तविक शासकीय विभागाच्या नावाचा वापर करून संबंधितांनी एक प्रकारे सरकारी तिजोरीतील जनतेच्या पैशाची उधळपट्टी व दुरुपयोग सुरू केला आहे या सर्व प्रकाराची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बापर्डेकर यांनी केली आहे. परंतू सध्याच्या सरकारमधील सरकारी काही गाड्यानची होणारी लूट यावर नककीच लक्ष देऊन शासनाची होणाऱ्या गाड्यांची आणि इंधनाची उधळपटटी रोखण्यास महाराष्ट्र शासन संबधित वरिष्ठ पोलीस अधीक्षकांमार्फत चौकशी करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधीक्षकांना आदेश देऊन त्वरित कार्यवाही करिता त्या त्या अधिकाऱ्यांना आदेश द्यावे, अशी मागणी सुरेश बापर्डेकर यांनी केली आहे.
