⚡मालवण ता.०६-: कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे विधान परिषद आमदार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांच्या आमदार विकास निधीतून मालवण तालुक्यातील ३१ शाळांना शैक्षणिक साहित्य मंजूर झाले आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी दिली आहे.
यामध्ये मालवण तालुक्यातील सौ. इं. द. वर्दम हायस्कुल- विरण, प्रगत विद्यामंदिर – रामगड, माध्यमिक विद्यालय-बिळवस, डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूल – मालवण, वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय – कट्टा, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय- मालवण, माध्यमिक विद्यामंदिर- असरोंडी, जनता विद्यामंदिर – त्रिंबक, त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय- शिरवंडे, श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय- तळगांव, सौ. हिराबाई भास्कर वरस्कर विद्यामंदिर – वराड, न्यू इंग्लिश स्कुल ज्युनिअर कॉलेज – आचरा, सौ. सुहासिनी परब हायस्कुल- खोटले, श्री. शिवाजी विद्यामंदिर- काळसे, अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल- मालवण, लक्ष्मीबाई टोपीवाला, कन्याशाळा- मालवण, रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय- मालवण, भंडारी एज्यूकेशन सोसायटी हायस्कुल – मालवण, रेकोबा हायस्कूल- वायरी मालवण,ओझर विद्यामंदिर -कांदळगाव, ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय- वायंगणी, ज्ञानदीप विद्यालय- हिवाळे, आर. ए. यादव हायस्कुल – आडवली, भ. ता. चव्हाण माध्यमिक विद्यालय- चौके न्यू इंग्लिश स्कूल- पेंडूर, मालवण, सरस्वती विद्यामंदिर- गावराई, श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल- वडाचापाट, श्री रामेश्वर विद्यामंदिर- आचरा, भरतगड हायस्कृत नंबर २ मसुरे देऊळवाडा, दत्ता सामंत इंग्लिश स्कूल- देवबाग, ऍड. गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूल- माळगांव या शाळांचा समावेश आहे.
