⚡बांदा ता.०४-: मळगाव येथील (कै.) उदय रमाकांत खानोलकर वाचनालय यांच्यावतीने महिला दिनाचे औचित्य साधून देण्यात येणारा (कै.) यशवंती धोंडू पटेकर स्मृती पुरस्कार यावर्षी पुणे येथील डॉ. सौ. पूजा पराग सामंत यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक ९ रोजी सायंकाळी ४ वाजता वाचनालयच्या सभागृहात होणार आहे.
यावेळी कोलगाव येथील निरामय केंद्राच्या संचालिका तथा सामाजिक कार्यकर्त्यां वंदना करंबेळकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. दरवर्षी वाचनालयच्या वतीने कर्तृत्ववान महिलेला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. शाल, श्रीफळ, मानपत्र, रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
या कर्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन वाचनालयच्या संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
