कुक्कुटपालनाच्या माध्यमातून महिलांनी पुढे येत घरोघरी अंड्यांचे उत्पादन घ्यावे…

मंत्री दिपक केसरकर:सिंधुदुर्ग जिल्हा “हॅप्पी एग” म्हणुन भविष्यात ओळखला जाईल…

⚡सावंतवाडी ता.०४-: कुक्कुटपालनाच्या माध्यमातून महिलांनी पुढे येत घरोघरी अंड्यांचे उत्पादन घ्यावे जेणेकरून येणाऱ्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा “हॅप्पी एग” म्हणुन भविष्यात ओळखला जाईल. यासाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य चांदा ते बांदा योजनेअंतर्गत देण्यात येईल असे ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

तळवडे येथे चांदा ते बांदा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कुक्कुटग्राम आणि शेळी गट वाटप कार्यक्रम प्रसंगी मंत्री केसरकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तळवडे सरपंच विनिता मेस्त्री, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.श्री खरे, सहाय्यक उप आयुक्त डॉक्टर संसारे निलेश रेड्डी, शिंदे शिवसेना जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, विधानसभा संपर्कप्रमुख प्रेमानंद देसाई, तालुका प्रमुख नारायण उर्फ बबन राणे, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, रत्नसिंधु योजनेचे सदस्य सुरज परब, रवी परब,जालिंदर परब, गुणाजी गावडे,योगेश नाईक,साईप्रसाद राणे आदी उपस्थित होते.
मंत्री केसरकर पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बचत गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने पुढे येत आहेत अशा महिलांच्या हाताला बळकटी देण्यासाठी सांगते बांधता या योजनेअंतर्गत पालन आणि शेळीगट पालन या योजना राबवण्यात येत आहेत तळवडे पंचक्रोशीतील महिलांना या योजनेअंतर्गत शेळी गट आणि कुक्कुटपालन या योजनेचा लाभ देण्यात आला आहे सुरुवातीच्या टप्प्यात 2800 महिलांना कोंबडीची पिल्ले वाटप करण्यात येणार आहेत त्याशिवाय शेळी गटही वाटप करण्यात येणार आहे भविष्यात या माध्यमातून महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कुक्कुटपालनाचा विचार करता बॅकयार्ड पोल्ट्री च्या माध्यमातून कोंबड्यांना उघड्यावर सोडून त्यांचे पालन पोषण केल्यास ती आनंदी राहते आणि अशा कोंबड्यांपासून मिळणाऱ्या अंड्यांना हॅप्पी एग असे म्हटले जाते या अंड्यांना बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे त्यामुळे कुक्कुटपालनाच्या माध्यमातून घरोघरी अशा अंड्यांचे उत्पन्न घेतल्यास भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हा हॅप्पी एग साठी ओळखला जाऊ शकतो परंतु महिलांनी यासाठी मेहनत आणि चिकाटी ठेवणे गरजेचे आहे.
ते पुढे म्हणाले आज बाजारपेठेमध्ये बकऱ्याच्या मटणाला मोठी मागणी आहे त्यामुळे शेळीपालनाच्या माध्यमातून भविष्यात मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतल्यास शिवाय एकत्र येत असा उद्योग उभा केल्यास महिला किंवा पुरुष आर्थिक उन्नती साधू शकतो त्यासाठी मानसिकता असणे गरजेचे आहे दुसरीकडे रत्नसिंधू योजनेअंतर्गत विचार करता या ठिकाणी असलेल्या आंबा आजूबागायतीमध्ये दहा खोल्या काढून त्या ठिकाणी रेस्टॉरंट सुरू केल्यास शासनामार्फत दहा लाखापर्यंत अनुदान देण्याची तरतूद आहे त्यासाठी ही युवकांनी पुढे येणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट होण्याचे स्वप्न माझ्याबरोबरच कै प्रकाश परब यांनी पाहिले होते आज त्यांचा मुलगा सुरज परब राजकारणामध्ये पुढे येत आहे जेव्हा एखादा तरुण युवक पुढे येत असतो तेव्हा त्यांच्या मागे सर्वांनी ठाम उभे राहणे गरजेचे आहे असे झाल्यात आपल्या जिल्ह्याबरोबरच सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होईल.

You cannot copy content of this page