⚡सावंतवाडी ता.०४-: भाजप युवा मोर्चा बांदा मंडळ युवक तालुका अध्यक्षपदी सिद्धेश कांबळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र भाजप युवा मोर्चा जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष संदीप मिस्त्री यांनी नुकतेच दिले असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे दरम्यान याआधी श्री कांबळी यांनी युवक तालुका उपाध्यक्षपदीसह सध्या ते तळवणे ग्रामपंचायत सदस्य म्हणून ते काम करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना आता बांदा तालुकाध्यक्ष मंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार नितेश राणे माजी खासदार निलेश राणे यांचे त्यांनी आभार मानले आहेत.
भाजप युवा मोर्चा बांदा मंडळ युवक तालुका अध्यक्षपदी सिद्धेश कांबळी यांची नियुक्ती …
