⚡कणकवली ता.०४-: श्री फोंडकण देवी स्पोर्ट्स अकॅडमी, निरोम, सिंधुदुर्ग व कणकवली तालुका अथलेटिक्स असोसिएशन, सिंधुदुर्ग आयोजित ८ मार्च जागतिक महिला दिना निमित्त ” पहिली महिला सिंधुदुर्ग जिल्हा मॅरेथॉन स्पर्धा २०२४” रविवार १० मार्च २०२४ रोजी सकाळी ७ वाजता कणकवली तालुक्यातील खारेपाटण हायस्कुल व ज्यु. कॉलेज मैदान खारेपाटण मध्ये घेण्यात येतील.
स्पर्धेचे गट १२ वर्षा खालील मुली -२ की.मी.,१४ वर्षा खालील मुली -३ की.मी,१६ वर्षा खालील मुली -४ की.मी, १८वर्षा खालील मुली -४ की.मी, महिला खुला गट -६ की.मी ,४५+ वर्षवरील महिला खुल गट -२ की.मी. धावणे असे गटामध्ये स्पर्धेत सहभाग घेता येईल. स्पर्धा शुल्क शलेय मुला- मुलीनं साठी रु.१५०/- व १८ वर्षाखालील, महिला खुलागटा साठी रु.३००/- प्रती खेळाडू आकारण्यात येतील. सर्व स्पर्धाकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येतील तसेच प्रथम तीन क्रमांकना मेडल्स ट्रॉफी व प्रविण्य प्रमाणपत्र देण्यात येईल.या मॅरेथॉनला ब्रँड आंबेसेंडर कु. आरती देशमुख, स्वप्नाली भास्कर बेनकर, हर्षदा बोडेकर, प्राची लाड, अंजली गायकवाड व अनेक स्पर्धक धवणार आहेत.
स्पर्धे नावे नोंदणी करिता अंतिम तारीख ७ मार्च २०२४ असे राहील. तरी जिल्ह्यातील सर्व शालेय, महाविद्यालयातील व गावातील मुली, महिला जेष्ठ महिला यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष समीर राऊत व सचिव. सौ सुवर्णा अभिजित जोशी यांनी केली आहे.तरी अधिक माहितीसाठी समीर राऊत, 7900197475, 8928883594 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
खारेपाटण येथे १० मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय महिला मॅरेथॉन स्पर्धा…
