शिवानी प्रभूखानोलकर यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानास प्रतिसाद
*💫वेंगुर्ला दि.२१-:* महाराष्ट्रात लहान मुली, महिला यांच्यावरील लैंगिक अत्याचारांमध्ये वाढ झाली असून त्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी ‘गुड टच अॅण्ड बॅड टच‘ या कार्यक्रमातून कु. शिवानी प्रभूखानोलकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले. वेंगुर्ला तालुका भाजपा महिला मोर्चो तर्फे आयोजित केलेले हे मार्गदर्शन व्याख्यान शहरातील प्राथमिक शाळा नं.३ व शाळा नं.४ येथे घेण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा चिटणीस अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, महिला मोर्चा शहर सरचिटणीस वृंदा गंवडळकर, नगरसेविका साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर, ईशा मोंडकर, मुख्याध्याक सावंत, मुख्याध्यापिक संध्या बेहरे, शिक्षक संतोष परब व इतर सहकारी शिक्षक उपस्थित होते. अतिशय संवेदनशील व अवघड वाटणारा विषय शिवानी प्रभूखानोलकर हिने सोप्या पद्धतीने मुलांशी संवाद साधत याबाबत मुलांमध्ये जागृती निर्माण केली.
