त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे २ लाखांच्या बक्षिसाचे मानकरी…

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात मालवण तालुक्यात द्वितीय..

⚡कणकवली ता.२९-: संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला.हा एक व्यापक आणि महत्वपूर्ण उपक्रम होता.या उपक्रमात मालवण तालुक्यातील त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेने सहभागी होऊन मालवण तालुक्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त करत प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे आणि दोन लाखांचे बक्षीस पटकावले आहे.


ग्रामीण भागातील छोटी शाळा असूनही शाळेने रंगरंगोटी, बोलक्या भिंती,वर्ग सजावट उत्कृष्ट करण्याबरोबर विविध उपक्रम राबविले आहेत.यावर्षी विविध प्रकारचे सुमारे ५२उपक्रम राबविले आहेत.त्यात तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा, मासिक पाळी व्यवस्थापन, व्यवसाय मार्गदर्शन, आर्थिक साक्षरता मार्गदर्शन,आरोग्य तपासणी,बॅंक विषयक मार्गदर्शन, प्लास्टिक नाविन्यपूर्ण उपक्रम, परसबाग, पर्यावरण संवर्धनासाठी मोठ्याप्रमाणात वृक्षारोपण व संवर्धन, शाळा विकासासाठी माजी विद्यार्थी सहभाग, शाळा व्यवस्थापन समिती सहभाग, ग्रामस्थ-पालक सहभाग,सी एस आर फंड मिळवणे,एम सी सी विषय सुरु ठेवणे, विविध स्पर्धा सहभाग, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनाची प्रभावीपणे अंमलबजावणी, अंडी उपक्रम , मंत्री मंडळ निवडणूक व बैठका घेणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, स्वच्छता माॅनिटर नियुक्त करुन वर्ग सजावट आणि स्वच्छता ठेवणे, शालेय परिसर, इमारत, स्वच्छतागृह स्वच्छ ठेवणे , प्लास्टिक मुक्त शाळा, तंबाखू मुक्त शाळा, प्रशस्त मैदान, पुरेशा भौतिक सुविधा या सर्व निकषांच्या जोरावर संस्था पदाधिकारी, शालेय समिती, शाळा व्यवस्थापन समिती,शिक्षक पालक संघ, माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने शालेय समिती अध्यक्ष उत्तम गांवकर यांच्या सहकार्याने मुख्याध्यापक तथा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे यांच्या कुशल नेतृत्वाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेऊन हे यश संपादित केले आहे. नेहमीच सर्व क्षेत्रांत आघाडीवर यशस्वी होत असलेल्या या शाळेच्या या यशाने मानाचा तुरा खोवला असल्याचे मुख्याध्यापक वामन तर्फे यांनी सांगितले

You cannot copy content of this page