गुणाजी गावडेंचा गंभीर आरोप: उद्या वर्षा निवासस्थानी प्रवेश;लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सावंतवाडी मतदार संघात ठाकरे सेनेला खिंडार..
⚡सावंतावडी ता.२८-: येथील वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी अखेर ठाकरे सेनेला रामराम ठोकला असून उद्या वर्षा निवासस्थानी त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार आहे. ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या गटबाजीला कंटाळून आपण प्रवेश करत असल्याचे गुणाजी गावडे यांनी सांगितले आहे.
याबाबत गुणाजी गावडे ग्लोबल महाराष्ट्र चॅनलशी बोलताना म्हणाले की, गेले अनेक वर्ष मी ठाकरे सेनेत प्रामाणिकपणे काम केल. वरिष्ठ नेत्यांनी माझा मानसन्मान राखला, परंतु तालुकाप्रमुख रुपेश राऊळ हे कुठल्याही गोष्टीत विचारात घेत नसून प्रत्येक ठिकाणी डावलण्याचा काम करत गटबाजी करण्याचा काम करत होते. त्यामुळे त्यांच्या या गटबाजीच्या राजकारणाला कंटाळूनच आम्ही ठाकरे गट सोडण्याचा विचार करून उद्या आमचा शिंदे शिवसेना प्रवेश होणार असल्याच श्री गावडे यांनी म्हटलं
