‘ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘ स्पर्धेत प्रथम क्रमांक..
⚡दोडामार्ग ता.२८-: साटेली भेडशी येथील श्री सातेरी केंद्रशाळा साटेलीने ‘ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘ स्पर्धेत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. साटेली केंद्रशाळा तीन लाखांच्या प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली आहे.विशेष म्हणजे जिल्ह्यातील नऊ आदर्श शाळांमध्ये साटेली केंद्र शाळा असून तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावणारी ही आदर्श शाळांमधील एकमेव शाळा आहे.शाळेच्या या यशाबद्दल शिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर, दोडामार्गचे गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत,उपशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात, गट शिक्षणाधिकारी निसार नदाफ (दोडामार्ग), गट शिक्षणाधिकारी कल्पना बोडके (सावंतवाडी ), केंद्रप्रमुख दीपा दळवी,सूर्यकांत नाईक ,गुरुदास कुबल, राजलक्ष्मी लोंढे व महादेव आव्हाड यांनी अभिनंदन केले.दरम्यान,मोरगाव येथील केंद्रशाळेने दुसरा तर कुंभवडे येथील पूर्ण प्रथामिक शाळेने तिसरा क्रमांक पटकावला.
साटेली केंद्रशाळा उपक्रमशील शाळा आहे.तालुका व जिल्हा स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये या शाळांचे विद्यार्थी देदीप्यमान कामगिरी करत आहेत.शिवाय शाळेची गुणवत्ता टिकवण्यासाठी शिक्षक मेहनत करत असतात.त्यामुळेच शाळेला आदर्श शाळेचा दर्जा प्राप्त झाला आहे.शाळेने आतापर्यंत विविध पुरस्कार आणि किताब मिळवले आहेत.’ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘ या अभियानात प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याने शाळेच्या शिरपेचात आणखी एका तुऱ्याची भर पडली आहे.शाळेचे मुख्याध्यापक पूनम पालव,दीपक दळवी रामा गावस संपदा दळवी, संजीवनी आवडन या सर्वांनी अथक परिश्रम केल्याने शाळेचा प्रथम क्रमांक आला.
………
कोट
‘ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘ मध्ये आमच्या शाळेचा प्रथम क्रमांक आला,त्याचे सारे श्रेय मला सहकार्य करणारे माझे सहकारी शिक्षक,पालक,ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांचे आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरले.
- पूनम पालव – धुरी,
मुख्याध्यापक
