Headlines

ईमारत बांधकाम कामगारांची जाचक अट रद्द…

तीन महिने काम केल्याचे प्रमाणपत्र किरण सामंत यांच्यामुळे झाले रद्द:शिवसेनेच्या रुपेश पावसकर, कामगार नेते बाबल नांदोसकर यांच्या प्रयत्नांना यश..

⚡कुडाळ ता.२६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ईमारत बांधकाम कामगार यांना ठेकेदार यांच्याकडे ३ महिने काम केल्याचे प्रमाणपत्र मिळावे.अशी शासन निर्णय सोडून जाचक अट लादली होती या अटीचा जिल्ह्यातील बांधकाम कामगार यांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत होता या मागणीचा विचार करून मंत्रालय स्तरावर तातडीने दखल घेऊन या विषय तात्काळ निकाली काढून कामगारांना न्याय दिला त्याबद्दल शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर,ईमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जिल्हाध्यक्ष श्री. बाबल नांदोसकर यांनी श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांचे जाहीर आभार व्यक्त केले.

दरम्यान श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांनी आपल्या लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व करावे अशी भावना ही श्री पावसकर यांनी व्यक्त केली.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ईमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाचे विविध तरांकित प्रश्न मांडले. त्यातील प्रामुख्याने हा प्रश्न होता. अखेर किरण सामंत यांच्या प्रयत्न मुळे हा प्रश्न मार्गी लागल्याने श्री रुपेश पावसकर यांनी भेट घेऊन श्री सामंत यांचे आभार व्यक्त केले.यावेळी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जिल्हाध्यक्ष श्री. बाबल नांदोसकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page