संजय गवस:मुंबई चा मुद्दा घेऊन निवडणूकीत प्रचार केल्यास जनताच तुमचा हंसा करेल; केसरकरांना टोला..
दोडामार्ग ता.२६-: शिक्षणमंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांना आता खासदार विनायक राऊत हे मुंबई वासीय आहेत यां स्वप्न पडले त्यांनी गेली दहा वर्षे काय झोप चे सोंग घेतले होते काय?केवळ भाजपाच्या नेत्यांना खूश करण्यासाठी ही उठाठेव सुरू आहे. खासदार राऊत यांच्या विरोधात बोलण्या सारखे शिंदे गटाकडे काही नाही.असा टोला ठाकरे सेनेचे दोडामाल तालुकाप्रमुख संजय गवस यांनी लगावला.दरम्यान गेली वर्षे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावागावात पोहचून सामान्य जनतेच्या समस्या खासदार राऊत यांनी जाणून घेतल्या त्यामुळे ते जनतेच्या मनातील लोकप्रिय खासदार आहेत.असे ही त्यांनी यावेळी म्हटल आहे.
यावेळी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात श्री गवस यांनी म्हटले आहे की येत्या लोकसभा निवडणुकीत ते खासदार विनायक राऊत हे पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. त्यामुळे मुंबई चा मुद्दा घेऊन निवडणूकीत प्रचार केल्यास जनताच तुमचा हंसा करेल.. गेल्या दहा वर्षांत सिंधुदुर्ग,, रत्नागिरी जिल्ह्यात केंद्र व राज्यशासनाचे अनेक प्रकल्प मार्गी लावले.. याउलट आमदार कोरोनांच्या काळात मतदारसंघात किती होते..?सर्वसामान्य जनतेला किती मदत केली.. यांचा सर्व लेखाजोखा मतदारसंघातील जनता जाणून आहे.. तसेच मतदारसंघात पेक्षा आपण मुंबई व गोव्यात जास्त असतात.. ज्या लोकांचे आपण आता गोडवे गात आहात त्यांच लोकांनी आपल्या ला पाडण्यासाठी युती धर्म न पाळतात मोठी मदत अपक्ष उमेदवारांला केली होती… मतदारसंघात खासदार राऊत शेवटच्या टप्प्यात आपल्या साठी गावोगावी फिरले व नाराज शिवसैनिकांना आपण्यास मदत करण्याचा आदेश दिला.. व त्यांच्या वेळी आपला विजय सुकर झाला.. खासदार राऊत यांच्या टिका करताना त्यांनी केलेल्या उपकाराची जाण ठेवावी.. त्यांनी कधी च केसरकर यांचा कार्यकर्ता.. हा आपला कार्यकर्ता असा भेदभाव केला नाही.. त्यामुळे जे आपल्या बरोबर आज गेले ते ही खासदार राऊत यांचा सन्मान करतात… यावेळी आपला कोणत्याही मुद्दा या निवडणुकीत राऊत यांच्या विरोधात चालणार नाही.. हे मात्र लक्षात ठेवावे.. मतदार पुन्हा एकदा आपला हक्काचा खासदार म्हणून विनायक राऊत यांना लोकसभेत पाठवितील ऐवढे मात्र निश्चित आहे असा विश्वास देखील श्री गवस यांनी यावेळी व्यक्त केला.
