गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने निषेध

*राजीनाम्याची केली मागणी*

*💫सावंतवाडी दि.२१-:* राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचा झालेल्या आरोपावरून सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी अनिल देशमुख यांनी तात्काळ गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे. यावेळी जयप्रकाश चौकात भाजपने राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी शहरध्यक्ष अजय गोंदावळे,महिला.शहरध्यक्ष मोहिनी मडगावकर,नगरसेवक आंनद नेवगी, परीक्षेत मांजरेकर.अमित.परब दिलीप भालेकर, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page