मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल मानले आभार
⚡सावंतवाडी ता.२१-: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, यांनी मराठा समाजाला छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन वचनपूर्ती केली व मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीत १०% आरक्षण हे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून विधानसभा अध्यक्ष श्री.राहुल नार्वेकर यांच्या समोर मराठा आरक्षण ठराव सर्वानुमते मंजूर करून कुठचाही समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले आहे.त्यामुळे सर्व समाज बांधवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष अभिनंदन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एवढ्या जलद निर्णय घेऊन कोणत्याही समाज बांधवांच्या भावना न दुखवता मराठा समाजातील जनतेला न्याय दिल्याबद्दल भाजप जिल्हा किसान मोर्चा सरचिटणीस अजय सावंत व चराठा ग्रामपंचायत उपसरपंच अमित परब यांनी त्यांचे आभार मानले व आपल्या राज्याला असे क्रियाशील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लाभणे व आम्ही त्याच्यासोबत काम करणे हेच आमचे भाग्य आहे.
