प्रवीण भोसले व अर्चना घारे यांचा आरोप: नागरिकांचे पैसे न मिळाल्यास सीआयडी चौकशीची मागणी करणार..
⚡सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडी शहरात कमी दरात कर्ज उपलब्ध करून देतो अशा फायन्स कंपनीच्या विरोधात राष्ट्रवादीने सर्वप्रथम याबाबत पोलिसांना ही बाब निर्दशनात आणून निवेदन दिले असताना देखील पोलिसांनी कोणतीही दखल न घेतल्याने आज तालुक्यातील अनेक लोकांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे याला पूर्णपणे सावंतवाडी पोलीस जबाबदार आहेत असा आरोप माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले,व सावंतवाडी राष्ट्रवादी विधानसभा महिला अध्यक्ष अर्चना घारे यांनी आज येथे केला.दरम्यान राज्यात गेल्या वर्षभरात अनेक फसवणुकीचे गुन्हेगारी वाढली असताना देखील राज्य सरकार कोणतीही दखल घेत नसल्याने राज्यातील ग्रह खात हे पूर्णपणे अपयशी ठरले आहे,असा आरोप देखील माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केलाते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की आज तालुक्यातील अनेक लोकांनी आपल्या उद्योग व्यवसाय साठी आपल्याला व्यवसाय करण्यासाठी कर्ज मिळले म्हणून आपले दागिने वगैरे घाण ठेवून त्या संबंधित कंपनीला पैसे दिले त्यात काही ग्राहकांना पैसे देखील मिळाले परंतु काही जणांना मिळाले नसून संबंधित व्यक्ती आता कार्यालयाला ठाळे ठोकून फरार झाला आहे .त्यामुळे संताप नागरिकांनी काल पोलीस स्टेशनचे राष्ट्रवादीच्या कार्यालयात संपर्क साधून झालेल्या घटनेबाबत माहिती दिली. दरम्यान
याबाबत आम्ही पोलिसांना वारंवार सांगून देखील याची पोलिसांनी दखल न घेतल्याने आज या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे याची लवकरात लवकर संबंधिताचा शोध घेऊन लोकांचे पैसे परत करावे अन्यथा आम्ही त्याची सीआयडी मार्फत चौकशी
मागणी करू असे ही राष्ट्रवादीच्या माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व अर्चना घारे परब सांगितले.
