⚡सावंतवाडी ता.२०सहदेव राऊळ-: मळगाव-नेमळे मुख्य रस्ता ते रवळनाथ मंदिरपर्यंत जाणारा रस्ता आणि पुलाच्या नूतनीकरण कामाचे भूमीपूजन भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मधून हा रस्ता व पूल मंजूर झाले आहे. यावेळी सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे, माजी सभापती राजू परब, सरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सरपंच गणेश पेडणेकर, निलेश कुडव, दादा परब, गुरुनाथ गावकर, निळकंठ बुगडे, पांडुरंग राऊळ, दीपक जोशी, प्रकाश जाधव, नवनाथ राऊळ, तात्या लातये, प्रसाद नाईक, प्रेमनाथ राऊळ आदिंसह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
