पुलाचे माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते भूमीपूजन..
सावंतवाडी ता.२०-:सावंतवाडी : सहदेव राऊळ : जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेल्या मळगाव-बादेकरवाडी येथील स्मशान भूमी सुशोभीकरण कामाचे भूमीपूजन मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर यांच्या हस्ते तर माजी आमदार राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. तर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या पुलाचे भूमीपूजन माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले, तर पांडुरंग राऊळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सभापती राजू परब, माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, माजी सरपंच निलेश कुडव, शक्तिकेंद्र प्रमुख निळकंठ बुगडे, तात्या लातये, दीपक जोशी, नवनाथ राऊळ, निखिल राऊळ, दादा परब, प्रमोद गावडे व कार्यकर्ते उपस्थित होते.
