नगराध्यक्ष समीर नलावडे यांची सूचना_
*💫कणकवली दि.२०-:* शहरातील चिकन , मटण विक्रेत्यांच्या स्टॉलमधील स्वच्छतेसंदर्भात नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, आरोग्य सभापती अभि मुसळे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिकन मटण व्यावसायिकांची बैठक पार पडली. शहरातील चिकन, मटण विक्रेत्यांनी आपल्या स्टॉलमध्ये राखावयाच्या स्वच्छतेबाबत या बैठकीत उहापोह करण्यात आला. चिकन मटण विक्रेत्यांनी आपल्या स्टॉलमध्ये स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत अशा सूचना यावेळी नगराध्यक्ष नलावडे यांनी दिल्या.चिकन, मटण सेंटर स्वच्छ ठेवण्यासाठी ओट्याच्या बाजूने टाईल्स बसवून घ्याव्यात. फ्लोअरिंग ला फरशी बसवून स्वच्छता राखावी अश्या सूचना आरोग्य सभापती अभि मुसळे यांनी केल्या. कणकवली शहराला स्वच्छ सर्वेक्षणमध्ये नुकतेच ओडीएफ प्लस प्लस दर्जा मिळाला आहे. थ्री स्टार दर्जाच्या दिशेने कणकवली शहराची वाटचाल सुरू आहे. यासाठी सर्वच घटकांनी आपली जबाबदारी जाणून स्वच्छता पाळणे आवश्यक आहे. यावेळी नगरसेवक ऍड.विराज भोसले, महेश सावंत, कन्झ्युमर्स सोसायटी चेअरमन संदीप नलावडे, चिकन मटण व्यावसायिक चंदन वाळके, विलास राणे, भाई साटम, पारकर, शेख आदी उपस्थित होते.
