येणाऱ्या काळात वडेट्टीवार आणि आमचे बॉस एकत्र सागर बंगल्यावर असतील…

आमदार नितेश राणे यांचे सूचक विधान:कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळेल..

⚡कणकवली ता.१९-: राहूल गांधींचे मोहब्बतचे दुकान आता बंद होत नफरतचे दुकान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देशभरात अनेक प्रवेश होत आहेत.देशात मोदींची गॅरंटी चालते हे दिसून येत आहे.त्यामुळे कोणाला अजून धक्का बसला तर नवल वाटू नये.विजय वडेट्टीवार यांनी माझ्या भाषणावर आक्षेप घेतला. येणाऱ्या काळात वडेट्टीवार आणि आमचे बॉस एकत्र असतील. सागर बंगल्यावर असतील असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.यातून वडेट्टीवार यांच्या प्रवेशाला दुजोरा दिला आहे.

कणकवली येथे आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
आम.नितेश राणे म्हणाले,यापूर्वी फडणवीस यांनी आरक्षण टिकवून दाखवलं होत. कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळेल आणि ते टिकेल. पोलीस माझं काय वाकड करू शकत नाही ह्याचा अर्थ कोणाचा अपमान असा नाही तर जो इशारा द्यायचा तो त्यांना कळला. मी हिंदूंची बाजू लावून धरतो. जे माझ्यावर टीका करत आहेत त्यांना मी विचारेन,मी हिंदूंची बाजू घेतोय हे चुकीचं आहे का? मी कुठेही चुकीचं बोललो नाही. जो संदेश मला द्यायचा होता तो मी दिलाय.असे त्यांनी सांगितले.
राज ठाकरे यांचा मित्र परिवार मोठा आहे. हिंदुत्वाचा विचार असलेले एकत्र आले तर चांगलंच होईल. त्याच विषयाला अनुसरून आशिष शेलार भेटले असतील.
ओवेशी यांचेवर बोलताना म्हणाले ,मोदींजींनी अरबी भाषा बोलून लोकांचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला. ओवेशीने कधी महाराष्ट्रात येऊन मराठी बोलण्याचा प्रयत्न केलाय का ? ओवेशी ज्या जिहादयांची बाजू घेऊन बोलत आहे. त्याला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नाही. त्यांना ह्या देशात शेरया कायदा आणायचा आहे. इम्तियाज जलील याच्या बद्दल बोलताना आमदार नितेश राणे म्हणले,जिहाद्यांची हिंदूंच्या जमिनीवर अनधिकृत बांधकामे असतील तर इम्तियाज जलाल मुंबई कुठूनही निवडणूक लढवूदे बुलडोझर कारवाई थांबणार नाही.

You cannot copy content of this page