394 व्या जयंतीनिमित्त दिली अनोखी मानवंदना…
कणकवली ता.१९-:
कणकवली तांबेवाडी येथील विक्रांत सावंत या युवकाने आपल्या रक्ताच्या साहाय्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंतीनिमित्त सुंदर असे चित्र रेखाटले असून, हे चित्र काढण्यासाठी त्याला अर्धा तास वेळ लागला. त्यानें काढलेल्या या चित्रांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
खडतर परिस्थितीवर मात करत तो सावंतवाडी येथील बी एस बांदेकर फाईन आर्ट कॉलेज मध्ये तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असून, गेल्या 4 वर्षापासून तो सुंदर अशी चित्र रेखाटत आहे.
