⚡सावंतवाडी ता.१७सहदेव राऊळ-: रेडी येथील शिवप्रेमी यशवंतगड यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी रोजी यशवंतगड येथे शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सकाळी ०७.३० वाजता श्री देवी माऊलीची ओटी भरून बाईक रॅलीने गडाकडे प्रस्थान, सकाळी ०८.०० वाजता शिरोडा बस स्थानक येथील शिवजयंती पुजन, सकाळी ०८.४५ वाजता रेडी ग्रामपंचायत येथून यशवंतगड येथे बाईक रॅलीने प्रस्थान, सकाळी ०९.०० वा यशवंतगड येथे शास्त्रोक्त पद्धतीने विधिपूर्वक मूर्तीपूजन, सकाळी १०.०० वाजता शिववंदना, ध्येयमंत्र, सकाळी १०.३० वाजता लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धा त्यानंतर दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. या उत्सवासाठी देणगी देणाऱ्यांनी
सुकन्या परब-९४०४७७८६११ (गुगल पे), अनसा भगत- ९४२३२६१५३३, सागर नाणोसकर-९४२३३०९१६६,
या क्रमांकावर संपर्क साधून जमा करायची आहे. शिवप्रेमींनी उपस्थिती दर्शवत या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवप्रेमी यशवंतगड यांच्यावतीने करण्यात आले आहे.
रेडी येथील यशवंत गड येथे १९ रोजी शिवजयंती उत्सवाचे आयोजन…
