घे भरारी फाउंडेशन तर्फे आयोजन: स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद..
⚡सावंतावडी ता.१७-: जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून येथील भोसले उद्यान येथे घेण्यात आलेल्या सूर्यनमस्कार स्पर्धेत दुर्गा गौतम सरनाईक यांनी 289 सूर्यनमस्कार घालून प्रथम क्रमांक पटकाविला. घे भरारी फाउंडेशन तर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
यात मीना विठ्ठल पिंगुळकर यांनी 235 सूर्यनमस्कार घालून द्वितीय तर सुप्रिया संजय मुधाळे यांनी 202 सूर्यनमस्कार घालून तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच ज्योती दुधवडकर, वंदना मडगावकर यांना उत्तेजनार्थ बक्षीस व गोल्ड मेडल देण्यात आली. यावेळी घे भरारी अध्यक्षा मोहिनी मडगावकर, उपाध्यक्ष रिया रेडीज, खजिनदार शारदा गुरव, रेखा कुमठेकर ,साक्षी परुळेकर सुश्मिता नाईक, सीमा रेडीज, वैष्णवी बांदेकर, उमा चोडणकर आदि उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाचे निवेदन व आभार मेघना राऊळ यांनी केले.
