नरडवे श्री अंबाबाई मंदिरात 18 फेब्रुवारीपासून हरिनाम सप्ताह…

⚡कणकवली ता.१७-: नरडवे गावचे ग्रामदैवत श्री देवी अंबाबाई मंदिरातील वार्षिक हरिनाम सप्ताह रविवार 18 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी या कालावधीत साजरा होणार आहे. यानिमित्ताने ग्रामस्थांकडून मंदिर आकर्षकरित्या सजविण्यात आले आहे.


दक्षिणाभिमुख असलेले हे मंदिर म्हणजे देवीचे शक्तीपीठ मानले जाते. भारतातील निवड दक्षिणाभिमुख मंदिरांपैकी श्री अंबाबाई मंदिर एक आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री. अंबाबाईच्या दर्शनासाठी व ओटी भरण्यासाठी भाविक , सुवासिनींची सप्ताह काळात गर्दी जमते. या हरिनाम सप्ताह निमित्त रविवारी सकाळी घटस्थापना, त्या नंतर अखंड नामस्मरण, भजने, हरिपाठ, दिंड्या, चित्ररथ असे कार्यक्रम होतात. सप्ताह कालावधीत दररोज दुपारी भाविकांसाठी महाप्रसाद व अन्य धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
या निमित्ताने मंदिर विविधांगी रंगांनी , फुलांनी आकर्षक सजविण्यात आले आहे.या सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन नरडवे ग्रामस्थांनी केले आहे.

You cannot copy content of this page