राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा प्रश्न:महिना भरापूर्वी लक्ष वेधूनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याच आरोप..
⚡सावंतवाडी ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही वर्षात फायनान्स कंपनीकडून स्थानिक ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असताना सावंतवाडीत कार्यालय सुरू करून लाखोंच्या बिन व्याजी कर्जाचे आमिष दाखवून ग्राहकांचे लाखो रुपये घेऊन या फायनान्स कंपनीने पोबारा केल्याचे शुक्रवारी निदर्शनास आले. अचानकपणे कार्यालय बंद झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येतात ग्राहकांनी तीव्र संताप व्यक्त करीत संपर्कातील अधिकाऱ्यांना फोनवरून धारेवर धरले. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत याबाबत पोलिसात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.दरमयान या फायनान्स कंपनी संदर्भात राष्ट्रवादीच्या माध्यमातून महिनाभरापूर्वी सावंतवाडी पोलीस निरीक्षकांकडे ही बाब निर्दशनात आणून दिली होती परंतु त्यांनी दखल न घेतल्याने त्या लोकांच्या आता आर्थिक फसवणूक झाली आहे त्यामुळे आता या लोकांच्या झालेल्या फसवणुकीला जबाबदार कोण घेणार असा सवाल आता राष्ट्रवादीच्या माध्यमातून तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
सावंतवाडी शहरात काही महिन्यांपासून एका फायनान्स कंपनीतर्फे कर्ज देण्याची सुविधा सुरु करण्यात आली होती त्यामध्ये सावंतवाडी शहरातील तसेच ग्रामीण भागातील लोकांनी ह्या योजनेत आपले पैसे भरले होते.
मात्र, शुक्रवारी सकाळी काही ग्राहक आपले पैसे घेण्यासाठी कार्यालयाकडे गेले असता ती फायनान्स कंपनीचे कार्यालय बंद झालेले निदर्शनास आले तसेच संबंधित अधिकारी कार्यालयाकडे नसल्याने ग्राहक आक्रमक झाले.
त्वरित सर्व ग्राहक एकवटले आणि संबंधीत कंपनीच्या लोकांना संपर्क केला असता ते लोक ग्राहकांना अर्वाच्य भाषा वापरून उडउडवी ची उत्तरे देत आहेत त्यामुळे ग्राहक सर्व आक्रमक झाले आहेत.
