मळेवाड येथे १९ व २० फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव…

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मळेवाड-कोंडुरेच्यावतीने आयोजन..


यंदाचे हे ६ वे वर्ष असून यनिमित्त १९ रोजी सकाळी ६:०० वाजता किल्ले श्री यशवंतगड ते मळेवाड जंक्शन ज्योत आगमन, सकाळी ९.०० वाजता मूर्ती पूजन, सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत संपूर्ण मळेवाड-कोंडूरे रॅली, दुपारी १.०० ते ३.०० पर्यंत महाप्रसाद, दुपारी ३.०० ते सायंकाळी ५.०० वाजता सौ. शिवानी शैलेश पराब (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी नगरसेविका, मुंबई) पुरस्कृत हळदीकुंकू कार्यक्रम, सायंकाळी ५.०० ते ६.०० वाजता स्थानिक भजने, सायंकाळी ६.०० ते रात्री ११.०० पर्यंत ग्रुप डान्स, वेशभूषा, प्रश्न मंजुषा, नाटिका आदी कार्यक्रम होणार आहेत. तर २० फेब्रुवारी रोजी रात्री ९:०० वाजता ‘इथे ओशाळला मृत्यू’ हा ऐतिहासिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे.या सर्व कार्यक्रमांचा व नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मळेवाड-कोंडुरेच्यावतीने करण्यात आले आहे.

⚡सावंतवाडी ता.१६सहदेव राऊळ-: श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मळेवाड-कोंडुरेच्यावतीने शिवजन्मोत्सव उत्सव १९ व २० फेब्रुवारी रोजी मळेवाड जकातनाका येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page