कणकवली न.पं.तर्फे आयुष्यमान भारत योजना मोफत कार्ड नोंदणी शिबीर…

⚡कणकवली ता.१४-: कणकवली नगर पंचायत क्षेत्रातील आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना( 5 लाख विमा ) या योजनेत नावे येऊनही अजूनही नोंदणी न केलेल्या पिवळे व केशरी कार्डधारक (ज्यांना धान्य मिळते) अश्या 3253 लाभार्थीची यादी कणकवली नगरपंचायतला प्राप्त झाली असून यातील जास्तीत जास्त लाभार्थी यांना यांचा लाभ मिळावा या साठी नगरपंचायतने
कणकवली नगरपंचायत येथे विशेष मोफत कार्ड नोंदणी शिबिर बुधवार 14 फेब्रुवारी 2024 ते शनिवार 17 फेब्रुवारी 2024 सकाळी 10.00 ते 5.00 या वेळेत आयोजित केले आहे.
सदर शिबिराला येताना आधार कार्ड किंवा रेशन कार्ड व आधार लीक मोबाईल घेऊन येणे आवश्यक आहे.तरी जास्तीत जास्त लाभार्थी यानी कार्ड नोंदणी करावी असे आवाहन कणकवली नगरपंचायतचे मुख्याधिकारी पारितोष कंकाळ व प्रशासक जगदीश कातकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page