फणसवाडी येथील घटना: अधिक उपचारासाठी आजरा येथे पाठवले..
आंबोली,ता.१४: येथील फणसवाडी येथे एका दुचाकीस्वाराला गव्याने धडक दिल्याने किरकोळ जखमी झाला. त्याला वनविभागाने आंबोली आरोग्य केंद्रात दाखल केले.उपचारानंतर त्याला आजरा येथे पुढील उपचारासाठी सोडण्यात आले. येथील वेंगुर्ला बेळगाव आंबोली मुख्य रस्त्यावरून गोव्याला जात असताना फणसवाडी येथे स्वप्नील श्यामराव कांबळे वय २९ देऊळवाडी ता.भुदरगड,जिल्हा कोल्हापूर हे दुचाकीने जात असताना गव्याने धडक दिली.
त्यात ते किरकोळ जखमी झाले.यानंतर तिथल्या स्थानिकांनी याबाबत वनविभागाला कळवले तसेच पोलिसांना कळवले.यानंतर पोलीस व वनविभागाचे अधिकारी वनक्षेत्रपाल विद्या घोडके आणि वनरक्षक भिंगारदिवे यांनी घटनास्थळी जाऊन त्यांना आंबोली आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टर आदिती पाटकर यांनी उपचार केले.आंबोली आरोग्यकेंद्रात त्यांनी जबाब घेतला आणि वनविभागाने त्यांना आजरा येथे हॉस्पिटल मध्ये पुढील उपचार करण्यासाठी नेऊन सोडले.उपचाराचा खर्च वनविभागाकडून देण्यात येणार आहे.
